1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शरद पवार आणि नरेंद्र मोदी मिळून शेतकऱ्यांना टोपी घालताहेत; राजू शेट्टी

raju shetty
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोनही नेते मिळून संगनमताने शेतकऱ्यांना टोपी घालण्याच्या प्रयत्न करताहेत अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. साखर कारखानदार यांनी काढलेल्या कर्जाचे संकट दिसते, पण शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाचे संकट या नेत्यांना दिसत नाही का? असा सवाल देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केला.

उद्या म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद होणार आहे. राजू शेट्टी यांनी आजरा या ठिकाणी या ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना राजू शेट्टी यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

साखर कारखान्याने एफआरपी एकरकमी दिल्यास सूतगिरणी प्रमाणे बंद पडतील, अशा पद्धतीची वक्तव्य काही नेते करत आहेत. पण ते शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाबाबत बोलण्यास तयार नाहीत. एफआरपीचे केंद्र सरकारला तुकडे करायचे आहेत. तर शरद पवार यांचे देखील त्याला समर्थन दिसत आहे. तसेच शेतकरी विरोधी कायदे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना टोपी घालण्याबाबत एकमत झाल्याची टीका यावेळी शेट्टी यांनी केली.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदींचे मानले ...

    April 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्...

    Punjab Elections 2022I आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवं...

    January 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: विधानसभा निवडणूकीत (assembly elections) कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी निवडणूक आयोगाने रैली आणि ज...

    नागपुरात प्रभाग रचनेवर कॉंग्रेस पक्ष नाराज

    February 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: उत्तर आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सोयीने प्रभागाची र...