1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा

Sanjay Raut
Spread the love

शिवसेना नेते संजय राऊत आज बुधवारी गोवा दौऱ्यावर जात आहेत. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने आपण तेथे जात असल्याची माहिती राऊत यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होते. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असे ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

‘महाराष्ट्र आणि गोव्याची संस्कृती जवळपास सारखी आहे. ते महाराष्ट्राच्या जवळचे राज्य आहे. पण, आता तिथे पश्चिम बंगालमधील तृणमुल काँग्रेसने प्रवेश केला आहे. मग, आम्ही का नाही लढणार?. गोव्यातील भाजप सरकार नवनवीन थापा मारतात. त्यांना मतदारांनी अद्दल घडवणे आवश्यक आहे. तो धडा शिवसेना पक्ष शिकवू शकतो. गोव्यात आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचू. तिथे संघटनाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

शिवाय ‘महाराष्ट्रात आम्ही कुठेही फोडाफोडी केली नाही. किमान समान कार्यक्रम ठरवून तीन पक्ष एकत्र आलो. त्यामुळे गोव्याची तुलना महाराष्ट्रासोबत होऊ शकत नाही. कारण, गोव्यात कोण कोणासोबत कधी जाईल हे सांगता येत नाही. गोव्यातील जनता एका आमदाराला मत देते. निवडून आल्यानंतर तोच आमदार दुसऱ्या पक्षात जातो. गोव्यातील हे फोडाफोडीची राजकारण कुठंतरी थांबवायला हवे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. गोव्यात शिवसेनेची कोणासोबत आघाडी झाली तर ठीक आहे. नाहीतर शिवसेना एकटी लढेल’ असे राऊत यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    खेळाडूंसह सर्वांनी नियमित योगासने करावी; डॉ. सुभाष च...

    June 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपुरात धावत्या मेट्रोत साजरा झाला जागतिक योगदिवस नागपूर :- शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध व्यायाम आणि आ...

    पीएम केअर फंडच्या साईटवरून मोदींचा फोटो हटवा; सरकारल...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोना महामारीशी लढण्यासाठी देशभरातून निधी जमा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पीएम केअर फंड संकेतस्थळातू...

    “मी अरविंद केजरीवालांना भेटायला अधिकारी पाठवले...

    April 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love“मी अरविंद केजरीवालांना भेटायला अधिकारी पाठवले’: भगवंत मान नागपूर: आम आदमी पार्टीचे प्रमुख अरवि...