1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी; कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार ५०,००० रुपयांची भरपाई

supremecourt-thefreemedia
Spread the love

कोरोनामुळे देशात मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईबाबत सोमवारी अंतिम निर्णय देण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या मागील सुनावणीत, कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची भरपाई देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार ५०,००० रुपयांची भरपाई देणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाला केंद्राने सांगितले की, कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) भरपाईची रक्कम दिली जाईल.

देशात कोरोनामुळे मरण पावलेल्या सर्वांना ५०,००० रूपये भरपाईची रक्कम देण्याच्या केंद्राच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना पीडितांना भरपाईची रक्कम भरपाई देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी एनडीएमएला निर्देश देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आदेश दिला आहे.

सोमवारी सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एम आर शाह यांनी सांगितले की, कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ५०,००० रुपये दिले जातील आणि ते विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत केंद्र आणि राज्याने दिलेल्या रकमेपेक्षा जास्त असतील. मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण कोरोना नाही म्हणून कोणतेही राज्य ५०,००० रुपयांची भरपाईची रक्कम नाकारू शकत नाही. मृत्यूचे कारण दुरुस्त करण्यासाठी जिल्हा अधिकारी उपाययोजना करतील. जिल्हास्तरीय समितीचे तपशील वृत्तपत्रांमधून प्रकाशित केले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    यूपीएससी निकालात मुलींची बाजी

    May 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल ऑनलाइन उपलब्ध आहे...

    फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

    July 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसमुद्रपुर: विदर्भात मुसळधार पाऊस आहे. वर्धा जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री...

    ट्विटर आणि भारत सरकार यांच्यातील वाद परत हायकोर्टात

    July 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर आणि भारत सरकार यांच्यातील वाद परत समोर आला आहे. ट्विटरनी कन्टेन्टच्या बा...