1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जुन्या नोटा नाणी विक्री, खरेदीवर रिझर्व बँकेकडून इशारा

Spread the love

गेले काही दिवस ऑनलाईन आणि ऑफलाईन वर जुन्या नोटा, नाणी विकून भरपूर पैसे मिळविण्याच्या जाहिराती सातत्याने येत आहेत. अश्या नोटा नाणी विकणाऱ्या आणि खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून एक सूचना जारी केली गेली आहे. त्यानुसार अश्या साईटवर रिझर्व्ह बँक किंवा काही अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला जात असून रिझर्व्ह बँकेचा या प्रकाराशी कोणताही संबंध नसल्याचे त्यात नमूद केले गेले आहे. आरबीआयने त्यांच्या ट्वीटर हँडलवर या संदर्भात खुलासा केला आहे.

गेले काही दिवस रुपया, दोन रुपये, चार आणे अशी अनेक जुनी नाणी किंवा नोटा खरेदी विक्रीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर सुरु झाला असून अश्या नोटा नाण्याचे संघ्राहक नाणी विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. या नाणी, नोटांच्या बदली मोठी रक्कम मिळेल असे सांगितले जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन त्या संदर्भातील जाहिराती रोज झळकत आहेत आणि त्यात रिझर्व्ह बँकेचा संदर्भ दिला जात आहे. त्यावर रिझर्व बँकेने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा इशारा दिला आहे. अनेक साईटवर अशी नाणी, नोटा विक्री किंवा खरेदीवर कमिशन किंवा शुल्क मागितले जात आहे. रिझर्व्ह बँकेने असा अधिकार कुणाही व्यक्ती, संस्था, कंपन्यांना दिलेला नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

रिझर्व्ह बँक अशा कोणत्याही योजनेत सामील नाही आणि काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक रिझर्व्ह बँकेच्या नावाचा वापर करून जुन्या नोटा, नाणी विक्री खरेदीवर कमिशन घेत आहेत त्यामुळे असे व्यवहार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असा सल्ला दिला गेला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    एम्स रूग्णालयातील कोट्यवधीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशभरातील नामांकित रुग्णालय म्हणून ओळख असलेलं याशिवाय राजकीय नेत्यांपासून प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ज्या रुग्ण...

    “पीएम केअर फंडमध्ये जमा झालेला पैसा कुठे जातोय...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमाजी न्यायमूर्तीं लोकूर यांनी व्यक्त केली चिंता पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती ना...

    बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी सीएए कायद्यात सुध...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागरिकत्व कायद्यात सुधारणा व्हावी; मिलिंद देवरा बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि...