1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

या ‘तीन’ बँकेचे चेकबुक होणार रद्द

RBI
Spread the love

देशातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण झाल्याने ते आता सक्रीय झाले आहेत. याचबरोबर जुना चेक, IFSC कोड आणि बँकेचा MICR कोड देखील बदलला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जुन्या चेकने व्यवहार करत असाल तर तो चेक बाउन्स होऊ शकते.

जर तुम्ही जुन्या IFSC कोडचा वापर करून नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करत असाल तर हा व्यवहार अयशस्वी होऊ शकतो. दरम्यान तीन बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. १ ऑक्टोबरपासून हे जुने चेकबुक अवैध ठरू शकते. १५ दिवसांनंतर म्हणजे ३० सप्टेंबर पासून, अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँकआणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची जुनी चेकबुक अवैध ठरणार आहेत.

ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झाले असल्याची माहिती आहे. बँकाच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर सुमारे दोन वर्षांत कार्यवाही सुरू झाली आहे. अलाहाबाद बँकेचा MICR कोड आणि चेक बुक फक्त ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध आहे. जुना MICR कोड आणि चेक बुक १ ऑक्टोबर २०२१ पासून अवैध होईल. त्यामुळे बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी नवीन चेकबुक घ्यावे.

ग्राहक स्वतःच बँक शाखेला भेट देऊन चेकबुक घेऊ शकतात किंवा ते ऑनलाईन मागणी करू शकतात. पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) माहितीनुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँकेची जुनी चेकबुक ३० सप्टेंबरनंतर अवैध होतील. १ ऑक्टोबर २०२१ पूर्वी ग्राहकांना नवीन चेक बूक मिळवावे लागेल.

Claim Free Bets

ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की या दोन बँकांचे जुने चेक बूक बदलून नवीन चेकबुकसह IFSC कोड आणि PNB चा MICR कोड घेण्यात यावा असे सांगण्यात आले. चेकबुकसाठी इंटरनेट बँकिंग किंवा पीएनबी वन सेवेचा उपयोग करण्याचे आवाहन पंजाब नॅशनल बँकेकडून करण्यात आले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, बियांचा व...

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपर...

    देशात काल दिवसभरात 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद...

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. देशात 9 सप्टेंबरपासून कोरोनाब...

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा कोरोना पॉझिटि...

    June 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी स्वत: ट्वीट करत ...