1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कीर्तनाला झाली गर्दी; शीवलीला पाटीलवर गुन्हा दाखल

Spread the love

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवलीला पाटील या बिग बॉस मराठी सिझन ३ च्या माजी स्पर्धक आहेत. त्या कीर्तनासाठी आल्या होत्या. यावेळी प्रचंड गर्दी झाली. दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे आयोजन महागात पडले. याप्रकरणी तिघांविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला. पण, आयोजकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत कीर्तनाचे आयोजन केले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये. असे आदेश बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी दिले होते. देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने पाटील यांचे कीर्तन आयोजित केले. यावेळी कीर्तनास २०० हून अधिक लोक जमले.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पोलिसात तक्रार दिली. मंडळाचे आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे व किशोर पोफळकर (रा. देऊळगाव मही) यांच्याविरुद्ध गन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दिपाली चव्हाण यांना मृत्यूनंतरही न्याय मिळत नसल्याची...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमरावती जिल्ह्यातीथ मेळघाट शिवारातील हरिसाल येथे वनविभागात आर एफ ओ पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यां...

    असा अलौकीक शिवआराधक होणे नाही; उद्धव ठाकरे

    November 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे प...

    महाराष्ट्रातील सौंदर्य आता मोबाईल अँपवर

    September 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the love२७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या एका ...