1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह ; उद्धव सरकारचा निर्णय

nectar festival of freedom
Spread the love

राज्यात सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘आजादी का अमृत महोत्सव’ अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या ७५ आठवड्यात ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करण्याचा शासनाचा मानस असून त्या अनुषंगानेच शासकीय पत्रव्यवहार व इतर ठिकाणी या सुनिश्चित चिन्हाचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय पत्रव्यवहाराप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात यासंबधीचे बॅनर लावण्याचे निर्देशही सर्व मंत्रालयीन तसेच प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मोठा दिलासा! मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांम...

    January 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love२४ तासांत ११,६४७ नवे रुग्ण मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्य...

    परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया&...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’ असून, त्यांनी ह...

    ‘रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका;’ ...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपण…रावणाचा उल्लेख कुणास उद्देशून? महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मद...