1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

डिजिटल करेंसीवर नियंत्रणासाठी जागतिक तंत्र तयार करण्याची गरज: निर्मला सीतारमण

thumbnail-thefreemedia
Spread the love

इन्फिनिटी फोरममध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन क्रिप्टोकरन्सी विषयी माहिती दिली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सतत बदलणारे तंत्रज्ञान आणि मोबाईल-आधारित पेमेंट सिस्टमच्या ((tech-driven payment systems) प्रभावी नियमनासाठी जागतिक स्तरावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही ज्याद्वारे ते नियंत्रित केले जाऊ शकते.

इन्फिनिटी फोरममध्ये (Infinity forum) अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आपण राष्ट्रीय स्तरावर विचार करत असतानाही जागतिक व्यवस्था असायला हवी. याद्वारे आम्ही तंत्रज्ञानातील बदलांवर सातत्याने लक्ष ठेवू शकू.त्या म्हणाल्या कि, जागतिक प्रणालीतून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) असो किंवा तंत्रज्ञानाद्वारे पेमेंट असो, सर्वांवर एकाच प्रणालीद्वारे लक्ष ठेवता येते. सरकार क्रिप्टोकरन्सी वर (Cryptocurrency) विधेयक आणण्याच्या तयारीत आहे.

फिनटेकवर (Fintech) इन्फिनिटी-फोरमची दोन दिवसीय आभासी परिषद आयोजित केली जात आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या परिषदेत 70 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, देशातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी वित्त तंत्रज्ञान उपक्रमाचे वित्त तंत्रज्ञान क्रांतीमध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. फिनटेक उद्योगाचे प्रमाण अधिक व्यापक झाले आहे आणि त्याला लोकांमध्ये मान्यता मिळाली आहे, असेही त्या म्हणाल्या .

पीएम मोदी म्हणाले होते की, तंत्रज्ञानामुळे वित्त क्षेत्रात मोठा बदल होत आहे आणि गेल्या वर्षी एटीएम कार्डमधून पैसे काढण्यापेक्षा मोबाईल पेमेंट जास्त होत असत.

कार्यक्रमात, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सौरभ अग्रवाल म्हणाले की डिजिटल ओळख प्रणाली तयार करण्यासाठी जग इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सहकार्य करण्याचा विचार करत आहे. UIDAI चे CEO सौरभ गर्ग यांनी Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्यासोबत ‘इन्फिनिटी मंच’ कार्यक्रमात पॅनल डिस्कशन दरम्यान ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्राधिकरण सुरक्षा वाढवण्यासाठी आणि आधार वापरून करता येणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढवण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शोध घेत आहे.

Claim Free Bets


  RENUKA KINHEKAR

  RENUKA KINHEKAR

  All Posts

  Latest News

  Related Post

  View All

  गुरूजी करणार इम्पिरिकल डेटा ‘कलेक्टींग’च...

  December 25th, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveओबीसी आरक्षणासाठी सर्वांत मोठा अडसर असलेला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्यातील गुरुजींकडे सोपविणार अ...

  जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला; 2 जवान शहीद, 12 जखमीस

  December 14th, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveश्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ दहशतवाद्यांनी सोमवारी जम्मूमध्ये पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला. दह...

  रिबांसाठी सुरु केलेली सर्वात मोठी योजना होणार बंद

  June 26th, 2022 | RAHUL PATIL

  Spread the loveमोदी सरकारचा आणखी एक मोठा झटका नवी दिल्ली: कोविड महामारीमुळे देशातील करोडो लोकांसाठी मोदी सरकारने पंतप्रधान...