1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उद्याचा दसरा मेळावा हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा मेळावा: पंकजा मुंडे

Spread the love

बीडमध्ये उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नाही. कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असं सांगतानाच या मेळाव्याला येणारा कार्यकर्ता हा विचारांची ऊर्जा घेऊनच जातो, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

उद्या बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे या संबोधित करणार आहेत. या मेळाव्याच्या तयारीबाबत पंकजा मुंडे यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो. हा मेळावा लोकांच्या आदेशावरून आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

राजकारणाचा मूलमंत्र

बीडमध्ये दसऱ्याला भगवान बाबांच्या भक्तीचा मेळा जमतो. दरवेळी हा व्हिडीओ उत्सफूर्तपणे येतो. हृदयातून निघालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद असते. ही भक्तीची परंपरा आहे, ती नैसर्गिक आहे. लोकांनी मला आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा हा माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं… माझ्या मनात ही चार वाक्य आली आणि त्याचा व्हिडीओ झाला. लोकं खूप मोठ्या संख्येने तो व्हिडीओ बघत आहेत, असं त्या म्हणाल्या.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर परवा बांधणार ‘घड...

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील कलाक्षेत्रास राजकारणाचे वावडे फार आधीपासून आहेच त्यात भर म्हणून लवकरच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणे...

    महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावा ...

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू ला...

    युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष सूरज ठाकूर यांचा राजीनामा; प...

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशभरात काँग्रेस पक्षात आता कुठे जोश भरत असल्याचे चित्र असतानाच मुंबई काँग्रेस पक्षातील अंतर्गत धूसफूस पुढे...