1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद धोक्यात?

Spread the love

विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे उद्धव ठाकरे हे सदस्य नाहीत.

जगभरातील बहुतांश देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आपल्या देशासह महाराष्ट्रातही धुमाकूळ घातला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना अशा स्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील लोकांना वारंवार संयमाचे पाळण्याचे आवाहन करतच आहेत, त्याचबरोबर कठोर निर्णयही घेत आहेत. पण राज्यावर हे कोरोनाचे संकट असतानाच उद्धव ठाकरेंसमोर थेट मुख्यमंत्रिपद जाण्याचाच धोका निर्माण झाला आहे.

एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. राज्य विधानपरिषदेच्या 9 जागा येत्या 24 एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. या निवडणुकीत विधानसभेतील आमदार मतदान करतात. पण ही निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

Claim Free Bets

राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख नंतर जाहीर करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर या स्थितीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. कारण विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे उद्धव ठाकरे हे सदस्य नाहीत. असे असताना मुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली होती.

मुख्यमंत्रिपदावर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. 28 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे. कारण निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर निवडणूक जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भाजप उमेदवाराचा प्रचार; आशिष देशमुखांची काँग्रेसमधून...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयेत्या ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी आमदार आशिष देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेश...

    मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं; देवेंद्र फड...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमी मुख्यमंत्री नाही हे मला जनतेने जाणवूच दिलेलं नाही असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्...

    तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त शिवार’...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जलयुक्त शिवार योजना हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’मानला जातोय. पण या योज...