1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

व्हिडीओ व्हायरल : गाझियाबादमधील विकृताला तंदूरमध्ये रोटी चिकटण्यासाठी थुंकी लावल्याप्रकरणी अटक

Spread the love

सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक माणूस ज्यात थुंकून रोटी आणि नान बनवत आहे. गाझियाबादच्या सिहानीगेट परिसरातील चिकन कॉर्नरचा व्हायरल झालेला व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासन कारवाईला लागले आहे. एखाद्या व्यक्तीने थुंकून अन्न शिजवल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक संतापले आहेत. पोलीसही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्या आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे.

एक माणूस व्हायरल व्हिडीओमध्ये तंदूरी रोटी बनवताना दिसत आहे. रोटी बनवताना तो पीठापासून बनवलेल्या कच्च्या रोटीवर थुंकतो आणि मग ते शिजवण्यासाठी भट्टीत ठेवतो. आणखी बरेच लोक रेस्टॉरंटमध्ये उभे दिसतात. पण कोणाचेही लक्ष या व्यक्तीकडे जात नाही. रेस्टॉरंटच्या बाहेरून कोणीतरी हा व्हिडीओ बनवला आहे, जो आता व्हायरल होत आहे.

गाझियाबाद पोलीस स्टेशनच्या सिहानीगेट परिसरातील राकेश मार्गावर असलेल्या चिकन पॉईंटचे संपूर्ण प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवस जुना हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी गोंधळ घातला आणि चिकन पॉईंटवर कारवाईची मागणी करत निदर्शने केली. त्यानंतर पोलीस कारवाई करण्यात आली, रोटी बनवणाऱ्या तमिझुद्दीन नावाच्या व्यक्तीला अटक केली आणि त्याला तुरुंगात पाठवले आणि चिकन पॉईंट विरोधात अहवालही दाखल करण्यात आला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उत्तरकाशीत बस दरीत कोसळून २५ भाविकांचा मृत्यू

    June 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveचारधाम यात्रेतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस रविवार, ५ जून रोजी संध्याकाळी दरीत कोसळून अपघात झाला. उत्तर...

    समलिंगी विवाह प्रकरणी सुनावणीच्या थेट प्रक्षेपणास के...

    May 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी या मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी...

    राऊतांच्या इंटरव्हलनंतर नितेश राणे करणार स्टोरीचा क्...

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नव...