1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महिलांवर अत्याचार व्हावेत हे कोणत्या सरकारला वाटतं; संजय राऊत

Sanjay Raut
Spread the love

मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेने देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने सरकारला धारेवर धरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सर्व प्रकरणामुळे ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, मुनगंटीवार यांच्या भावनांची जाण ठेवत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना राऊत म्हणाले की,’सुधीर भाऊ खूप संवेदनशील आहेत. मला माहीत आहे. त्यांच्या भावनांचा नक्की विचार केला जाईल. आपल्या राज्यात महिलांवर अत्याचार व्हावेत असं कोणत्या सरकारला वाटतं? रावणालाही वाटत नसेल. रावणानेही सीतेवर अत्याचार केला नव्हता. सीतेला पळून नेलं. पण सन्मानाने सीतेला अशोक वनात ठेवलं. ही या भूमीची परंपरा आहे. इथे आपण स्त्रियांचा सन्मान राखतो. वाईट प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करतो. महाराष्ट्रात महिलांचा नेहमीच सन्मान राखला गेला आहे. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण सर्वांनी कठोर पावलं टाकली आहेत. हे सर्वांना माहीत आहे. सुधीर भाऊंनाही माहीत आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार संवेदनशील आहे’ असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, महिला अत्याचारांविषयी सरकारवर टीका करत मुनगंटीवार म्हणाले होते की,’महिला अत्याचाराच्या घटना सांगायला सुरुवात केली तर चोवीस तास कमी पडतील. तुमची सत्ता हजार वर्षे ठेवा पण महिला सुरक्षित ठेवा. अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकार बलात्कारासारख्या गंभीर विषयावर चर्चा करत नाही. विशेष पोलीस पथक तयार करून तातडीने अशा प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे. गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरली पाहिजे. पण यावर उपाययोजना करण्यापेक्षा मुख्यमंत्री राज्यपालांनी फॉरवर्ड केलेल्या निवेदनाला उत्तर देत आहेत. आता डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा आहे.’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली होती.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचे निधन...

    January 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष...

    महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाह...

    July 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट...

    राज्य सरकार सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांच्याविरोध...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष सध्या टोकाला पोहचला असल्याचे चित...