1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जो गोवा जिंकतो, तो दिल्ली जिंकतोच: काँग्रेस नेते चिदंबरम

chidambaram
Spread the love

आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असल्याने देशातील राजकीय पक्षांनी आत्तापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा दौरा करत भाजपला गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं साकडं यावेळी गोमंतकियांना घातलं आहे. तसेच गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपबरोबर कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी विधानसभा निवडणूकीची जय्यत तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, पुढील वर्षी होणारी गोवा विधानसभा निवडणूक आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात आम्ही यशस्वी होणार आहे. पणजीत निवडणूक प्रचार कार्यालय सुरु केल्यानंतर चिदंबरम कार्यकर्त्यांना संबोधित करताना चिदंबरम यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले, ‘मला तुम्हाला इतिहासातील एक गोष्ट सांगायची आहे..जो कोणी गोवा जिंकतो, दिल्लीत जिंकतो. 2007 मध्ये आम्ही गोवा जिंकलो..2009 मध्ये आम्ही दिल्ली जिंकलो. दुर्दैवाने 2012 मध्ये आम्ही गोवा गमावला, 2014 मध्ये आम्ही दिल्लीलाही गमावले. 2017 मध्ये गोवा जिंकला (कामगारांचा संदर्भ देत) पण आमचे आमदार ते हरले. ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोरोनाचे संक्रमण कमी झाले की, यात्रा, जत्रांना परवान...

    August 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आ...

    लालू’च्या घरी सीबीआयची धाड

    May 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष (आरजेडी) लालू यादव यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. लालू यादव...

    भारताचा पहिला इलेक्ट्रिक हायवे तयार होणार

    September 17th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, भारताचा पहिला इलेक्ट्रिक हायवे ल...