1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

टीटीसी च्या मदतीने एका वर्षाने रानमांजर बरे होऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त

Spread the love

पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या नॅशनल हायवे-7 वर अपघातात जखमी झालेल्या रानमांजरला (नर) उपचारासाठी नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला आणण्यात आले होते. २९ डिसेम्बर 2020 रोजी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला भरती करण्यात आलेल्या रानमांजरला पूर्णतः बरे झाल्या नंतर ९ जानेवारी २०२१ रोजी म्हणजेच जवळजवळ १ वर्षाने आपल्या स्वगृही म्हणजे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

अपघातात जखमी झालेल्या रानमांजरला त्याच्या तीनही पायाला इजा झालेली होती.

X-ray काढल्यानंतर त्याचा एक पाय तुटलेला होता, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे डॉ. मयूर काटे, डॉ सय्यद बिलाल अली, डॉ. रांचे असिस्टंट सिद्धांत मोरे व समीर नेवारे यांनी त्याच्या एका पायाची सर्जरी करून रॉड टाकला. उपचाराला योग्य प्रतिसाद देत तो रानमांजर बरा झाला. काही महिन्यानंतर त्याचा परत X-ray काढून हाड व्यवस्थित जुळले की नाही याची शहानिशा करून, एक छोटीशी सर्जरी करून तो रॉड काढण्यात आला. बरेच दिवस उपचार घेत रानमांजर हळूहळू बरा होऊ लागला.

उपचारासाठी त्याला एका छोट्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.त्यांतून मग खात्री करून घ्यायची होती की हा चालतो किंवा पळतो कि नाही, म्हणून त्याला मोठ्या पिंजऱ्यात (Enclosure) ठेवण्यात आले. सगळ्या टेस्ट झाल्या आणि नंतर हा जंगलात जगण्यास समर्थ आहे ही खात्री पटल्यावर डॉक्टर कडून त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यात आले.

जवळजवळ १ वर्ष ७ दिवस उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर राहिलेला हा पहिला पेशंट होता. ” सर्जरी झाली असल्याने त्याचे हाड जुळेपर्यंत त्याला ठेवणे आमचे कर्तव्य होते. आज इतकी कठीण सर्जरी झालेला आणि परत आपल्या घरी गेला हे बघून खूप आत्मिक समाधान मिळाले, आज एक जीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमुळे वाचला व सुखरूप घरी परत गेला”, असे कुंदन हाते (मेंबर ऑफ वाईल्डलाईफ एडवाइजरी) म्हणाले.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    MAHARASHTRA FLOOD I उपमुख्यमंत्र्यांनी केली अतिवृष्ट...

    July 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: विदर्भात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा,...

    समीर वानखेडेंना मोठा दिलासा

    February 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग...

    उद्धव सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच; कि...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्रांच्या स्वीय सहाय्य रात्री फोन करून मला मारण्याची धमकी देतो. मा...