सध्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरण चांगलच तापलंय. आर्यन खान, एनसीबी, समीर वानखेडे, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्या भोवती फिरतांना दिसतेय. एनसीबीच्या कारवाईने आधीच राज्यासह देशात खळबळ माजवली असताना आता समीर वानखेडे वादात सापडण्याची चिन्ह आहेत.
परिणामी भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संजय अश्या एकेरी नावाने उल्लेख करत निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आर्यन खानला अटलक केल्यानंतरचा एनसीबी ऑफिसमधील व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर टाकत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यावर निलेश राणे यांनी खोचक पणे टोला लगावला आहे. ” संज्या या व्हिडिओमध्ये कोरा कागद साईन करताना कुठे दिसला तुला??? काय तरी लाज बाळगा रे. लोकं आंधळे वाटले की काय तुला??? किंवा तू तरी गांजा मारून व्हिडिओ पोस्ट केलाय.” असा सवाल राणे यांनी मंडल आहे.
तसेच ठाकरे सरकारलाही आर्यन खान ची चनता जास्त असल्याचे राणे यांनी समाज माध्यमांवर म्हटले आहे. “ठाकरे सरकार आल्यापासून परीक्षा कुठल्याही असो गोंधळ होणारच, विद्यार्थ्यांना ठरवून त्रास दिल्यासारखं चाललंय. नियोजन शून्य ठाकरे सरकारला विद्यार्थ्यांपेक्षा आर्यन खान ने गांजा मारला की नाही, त्याला बेल का मिळत नाही, त्याला जेल मध्ये त्रास तर होत नाही ना ह्याची चिंता जास्त आहे.” असे ठोठावले आहे.
