1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महिला कॉंग्रेसमधील वादाला तोंड; आयात केलेल्या अध्यक्षाच्या विरोधात एल्गार

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर महिला काँग्रेसमधील असंतोष चव्हाट्यावर आला असून वादविवाद वाढत असून हा वाद विकोपाला गेला आहे. मनपा निवडणुकीच्या आधीच १८० महिला पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने पक्षासमोर आव्हान उभे ठाकले. १८ वर्ष काम केल्यानंतर १९ व्या वर्षी महिला शहर अध्यक्षाचे पद मिळाले असल्याचे प्रज्ञा बडवाईक यांनी पत्र परीषदेत सांगितले.नागपूर शहर अध्यक्षपदी नाश नुसरत अली यांची नियुक्ती होताच असंतोष उफाळून आला. महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रज्ञा बडवाईक यांच्यासह १८० जणांनी राजीनामे दिले. नाश अली यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

नाश नुसरत अली यांनी शहर महिला काँग्रेसचं शहराध्यक्ष बनविण्यात आलं. त्यांना पक्षाने आयात केल्याचेही बडवाईक म्हणाल्यात; त्यामुळं महिला काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. शहराध्यक्ष पदावरून प्रदेश सचिवपदी पदोन्नती देण्यात आलेल्या प्रज्ञा बडवाईक यांनी राजीनामा दिला. त्यांच्यासह १८० महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. यामध्ये विभागीय अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांचाही समावेश आहे.

२०१४ पासून सक्रिय महिला कार्यकर्त्यांला शहराध्यक्षपदाची जबाबदारी द्यायला हवी होती. परंतु, तसे काही झाले नसल्याचा आरोप प्रज्ञा बडवाईक यांनी केला. महिला काँग्रेसच्या बैठकीत नाश अली यांच्या नियुक्तीला विरोध करण्यात आला. नॅश अली यांच्याशी वैयक्तिक द्वेष नसल्याचं बडवाईक यांनी म्हटलं. पण, पक्षातील अनोळखी व्यक्तीला शहराध्यक्षपद कसं दिलं जातं, असं त्यांचं म्हणणंय.

नागपूर महापालिका निवडणुकीपर्यंत जुनी कार्यकारिणी कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महिला काँग्रेस अध्यक्ष यांनी पत्र पाठविण्यात आलं. येत्या सात दिवसांत निर्णय न घेतल्यास आम्ही वेगळी वाट धरू असा इशारा देण्यात आलाय. नाश अली यांच्या नियुक्तीला प्रज्ञा बडवाईक यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. नाश अली या स्थानिक पातळीवर सक्रिया नाहीत. त्यांनी मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या करेन हे पद मिळवलंय त्यांचा समाजसेवेशी व कार्यकर्त्यांशी संबंध नसल्याचे समोर आले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बाबासाहेबांनीच केली होती पहिल्यांदा ‘जय भवानी&...

    February 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठ...

    न्यूरोलॉजिकल सर्जन्सची वर्धेत होणार 12 वी वार्षिक परिषद

    April 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: न्यूरोसर्जनच्या मध्य-पश्चिम अध्याय “MCNS 2022” ची 12 वी वार्षिक परिषद दत्ता मेघे सभागृह...

    रामटेकची माती अयोध्या राममंदिराच्या बांधकामासाठी वाप...

    June 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveगडमंदिरावर महाआरती व कलश पूजन नागपूर: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटे...