1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुख्यमंत्र्याशी आज भेटणार शरद पवार; ईडी चौकशीच्या मुद्द्यावर होणार चर्चा

sharad pawar
Spread the love

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार आहे. राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती कळतेय.

परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा हा मुद्दा या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ईडी चौकशीबद्दल वक्तव्य केलं होतं. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या कंपनीवर ईडीने छापेमारी केली होती. ज्यावर शरद पवारांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांतही विरोधकांना शांत बसवण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचं वक्तव्य केलं होतं.

याचसोबत शरद पवारांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. सत्तेत असलेले मित्रपक्ष राष्ट्रवादी नेत्यांची काम करत नाहीत अशी तक्रार या बैठकीत झाल्याचं कळतंय. त्यामुळे आजच्या बैठकीत सरकारमधील दोन महत्वाच्या नेत्यांमधले वाद-विवाद दूर करण्यासंबंधी चर्चा होण्याचे संकेत आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अनिल देशमुखांना फरार घोषित करून; त्यांची पूर्ण संपत्...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही...

    राज्यातील शाळांत आता मराठी विषय सक्तीचा,सरकारचा आदेश...

    August 31st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्य सरकारने सोमवारी शिक्षण क्षेत्राकरिता एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी व खा...

    महाराष्ट्र I विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्य...

    April 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्...