1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’

parambir singh2
Spread the love

मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’ असून, त्यांनी ही मालमत्ता संजय पुनुमियाच्या नावे खरेदी केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय पुनुमियाविरोधात अग्रवाल नावाच्या व्यक्तीने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनुमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय पुनुमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. तो मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. पुनुमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे समजते. ही जमीन पुनुमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनुमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पुनुमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे.

अन् पुनुमियाचे बिंग फुटले

संजय पुनुमियाने जमीन खरेदीसाठी उत्तन (ठाणे) येथील खरेदी खताची कागदपत्रे जोडली होती. तीच त्याच्यासाठी अडचणीची ठरली आहेत. यातल्या पहिल्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्यात बाबुलाल अग्रवाल आणि त्यांच्या भावाचा सातबारा जोडल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या कागदपत्रांचा तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी तपास केला. तेव्हा त्या जमिनीचा मालकही पुनुमिया नसल्याचे स्पष्ट झाले. एकंदर पुनुमियाने स्वतः बनावट कागदपत्रे सादर करून येथील जमीन खरेदी केल्याची प्राथमिकदृष्या समोर येत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाविकास आघाडीला उखडून टाकण्याची भाषा करू नका

    November 15th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveआम्ही खपवून घेणार नाही; नवाब मलिक यांचा भाजपाला इशारा त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, माले...

    राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त केल्याची घो...

    July 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहे. राष्ट्र...

    गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना परवानगी; राज्य शा...

    September 18th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveराज्यातील निवडणूक नियमावली आणि कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या २५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल...