The Free Media

covid19

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील आता ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे.

राज्यात ११ नवीन ‘ओमायक्रॉन’ बाधित आढळले. यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या ६५ वर पोहचली आहे.आज आढललेल्या ११ ‘ओमायक्रॉन’ बाधितांमध्ये ८ जण हे मुंबई विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान आढळले. तर, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला.

आजपर्यंत आढळून आलेल्या ६५ ‘ओमायक्रॉन’बाधितांपैकी ३४ जणांची आरटीपीसआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.याशिवाय आज दिवसभरात राज्यात ८२५ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. तर, ७९२ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्याचा मृत्यू दर २.१२ टक्के आहे. तर, आजपर्यंत राज्यात ६४,९८,८०७ रूग्ण करोनामुक्त झालेले असून, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.७१ टक्के आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आलेल्या ६,७८,८३,०६१ प्रयोगाशाळा नमुन्यांपैकी आजपर्यंत ६६,५०,९६५ नमूने हे कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात ७३,०५३ जण गृह विलगिकरणात असून, ८६४ जण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

Shiv Sena-sanjay-raut-thefreemedia

बंडखोर व गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद – खासदार विनायक राऊत

शिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. शिवसेनेचं नाव

Read More »
Chief Minister Shinde-thefreemedia

सावरकरांच्या होणा-या अपमानावर आम्हाला बोलता आले नाही; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर

Read More »
stratup-thefreemedia

स्टार्टअप आणि युनिकॉर्न हे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे नवीन चालक

नवी दिल्‍ली: केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाने नवीन संधी उपलब्ध करून आणि देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे चालक म्हणून युवावर्गाला प्राधान्य देऊन देशाच्या आर्थिक परीदृश्यात विस्मयकारी परिवर्तन

Read More »

Latest News