1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उपमुख्यमंत्र्यांनी दिले एस टी महामंडळास 500 कोटी; कर्मचा-यांना दिलासा

ajit pawar
Spread the love

राज्यातील लालपरीचे चाक वेतनाअभावी थांबलेले असल्याने मागील ब-याच महिन्यापासून कर्मचारी हवालदील झाले होते. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार निधी वितरीत झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

Claim Free Bets

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 500 कोटी रुपये वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरीत करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट पूर्णपणे काेलमडले असून एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै 2021 महिन्याचे वेतन रखडले आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त एसटी कर्मचारी संघटनांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनतर शनिवारी औद्योगिक न्यायालयाने महामंडळाला झापत 3 सप्टेंबर पर्यंत सर्व एसटी कामगारांचे वेतन करण्याचे आदेश दिले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त केल्याची घो...

    July 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहे. राष्ट्र...

    ‘कोरोनासह ईडा पीडा घेऊन जा गे मारबत…. &#...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउपराजधानीतील बडग्या-मारबत महोत्सवाला प्रारंभ झाला असून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. पिवळी मारबत उ...

    मराठा समाजाची बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी; तुषा...

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात मागील ब-याच दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. यातच आता शिवसंग्राम, पुणे जिल्ह...