1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

प्रवीण दरेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

ncp
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य विधानपरिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले हाेते. या विराेधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आक्रमक झाले असून त्यांनी दरेकर यांचे विराेधात सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अाहे. त्यानंतर पाेलीसांनी दरेकर यांचेवर भादंवि कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

चाकणकर यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले की, प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रीय एकात्मेतला बाधा पाेहचवत राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करुन व महिलांच्या विनयशीलतेला धाेका पाेहचविणारे वक्तव्य केले अाहे. शिरुर येथे १३ सप्टेंबर राेजी आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांचे २३०व्या जयंती निमित्त आयाेजित केलेल्या कार्यक्रमाचे भाषणात दरेकर यांनी जाणुनबुजून राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य केले आहे.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात १४ सप्टेंबर राेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बातम्या प्रसारमाध्यमात येत हाेत्या. त्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी संबंधित विधान केले अाहे त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानामुळे एक स्त्री म्हणून माझे मनास लज्जा उत्पन्न झाली आहे. दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम महिला वर्गाचे मनात लज्जा उत्पन्न हाेवून महिलांच्या विनयशीलतेचा अपमान झालेला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ईडीने दाखल केले 1 हजार पानी आरोपपत्र; एकनाथ खडसे अडच...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपिंपरी-चिंचवड येथील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटु...

    चिपी विमानतळ उड्डाणास सज्ज; ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्ध...

    विजय वडेट्टीवारांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या...