1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

फ्रांसमध्ये सापडले करोनाचे नवे व्हेरीयंट

covid19
Spread the love

कोरोनाच्या ओमिक्रोनचा फैलाव युरोपीय देशात अतिशय वेगाने होत असतानाच फ्रांसमध्ये कोरोनाचे आणखी एक नवे व्हेरीयंट सापडले असून त्याचे नाव बी.१.६४०.२ असे केले गेले आहे. या व्हेरीयंटचा संसर्ग झालेले १२ लोक सापडले आहेत. हे व्हेरीयंट ४६ वेळा म्युटेट झाल्याचेही सांगितले जात आहे. या व्हेरीयंट चे संक्रमण किती वेगाने होईल किंवा ते किती धोकादायक ठरेल यावर संशोधन सुरु असून त्याचे निष्कर्ष येण्यास काही वेळ द्यावा लागणार आहे असेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांच्यात हे संक्रमण आढळले ते कॅमेरून येथून परतले होते. त्यामुळे हे व्हेरीयंट द. आफ्रिकेत फैलावू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. करोनाची नवनवी व्हेरीयंट सतत समोर येत आहेत. गतवर्षी सुद्धा अशी अनेक व्हेरीयंट आली असून त्यावर अजूनही संधोधन आणि अध्ययन सुरु आहे. कोणतेही नवे व्हेरीयंट दोन पातळीवर धोकादायक असू शकते.

एक त्याचा संक्रमणांचा वेग आणि दुसरे मृत्युदर. फ्रांस मध्ये मिळालेल्या या व्हेरीयंट बाबत अजून ही स्पष्टता नाही. ४६ वेळा बदल झालेला हा विषाणू लसीला मात देऊ शकेल अशीही शक्यता वर्तविली जात आहे. वैज्ञानिकांच्या मते नवीन व्हेरीयंट स्वतः मध्येच करोना लसीची प्रतिक्षा तयार करत आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    युरोपच्या ५३ देशात वेगाने वाढतोय करोना

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजागतिक आरोग्य संघटनेने केले जाहीर सध्याच्या काळात भारतात करोना केसेस मध्ये घट दिसत असली तरी रशिया आणि चीन म...

    ओमिक्रोन वैरिएंट सौम्य नाही: जागतिक आरोग्य संघटना

    January 7th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोरोनाचा नवा वैरिएंट ओमिक्रोन सर्व देशभर वेगाने पसरत असून तो माईल्ड म्हणजेच सौम्य प्रकारचा नाही असे जागतिक ...

    ‘Omicron’ नावाच्या नव्या वेरिएंट असू शकत...

    November 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveसध्या देशात परत कोरोनाच्या नवीन वेरिएंट ‘Omicron’ मूळे परत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तस...