1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

एअर इंडियाला आता टाटांची ताकद; 68 वर्षानंतर पुन्हा टाटा समूहाकडे मालकी

air-india
Spread the love

एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. मात्र, शेवटी टाटा सन्सनं बाजी मारली असून आता एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. एअर इंडियासाठी विक्रीसाठी लावण्यात आलेल्या आर्थिक बोलीत 85 टक्के हिस्सा हा कंपनीवरील कर्जदायित्वासाठी, तर 15 टक्के हा रोख रूपात सरकारी तिजोरीत येण्याचे अंदाजण्यात येत आहे. एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात गेल्याने आता मरगळ आलेल्या भारतीय हवाई सेवा क्षेत्रात चैतन्य संचारण्याची शक्यता आहे. एअर इंडियाची विक्री हे केंद्र सरकारच्या खासगीकरण मोहीमेतील एक मोठे यश मानले जात आहे.

जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्स कंपनी स्थानप केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात या कंपनीचे सार्वजनिकीकरण झाले होते. त्यामुळे कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले होते. मात्र, आज 68 वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात आली आहे.

Claim Free Bets

सरकारनं २०१७ मध्येच एअर इंडियाच्या विक्रीचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु त्यावेळी कंपन्यांनी त्यात फारसा सर दाखवला नव्हता. ऑक्टोबरमध्ये सरकारनं एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टच्या नियमांमध्ये ढील दिल्यानंतर काही कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीत रस दाखवला होता. नव्या नियमांअंतर्गत कर्जाच्या तरतुदीबाबत शिथिलता दाखवण्यात आली, जेणेकरून स्वामित्व असलेल्या कंपनीला पूर्णपणे कर्जाचा बोजा सहन करावा लागणार नाही. १९५३ मध्ये भारत सरकारनं ही कंपनी आपल्या अधिकार क्षेत्रात घेतली होती.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मनरो शाळेतील बांधकामावर कोर्टाकडून स्टे; चुकीच्या प्...

    October 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) १८६५ साली बांधण्यात आली. प...

    टोपे साहेब, वसुलीचा आकडा ठरला नसल्यामुळे परीक्षा रद्...

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्...

    १५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

    August 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेवेंंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता कधी होणार? असा प्...