1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘चंकी पांडेंच्या कुटुंबाच्या संकटात वाढ’

Spread the love

या’ कारणामुळे चिक्की पांडेंना समन्स

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आणि त्यांच्या कुटुंबाचा त्रास कमी होताना दिसत नाही. नुकतेच एनसीबीने आर्यन खान प्रकरणात चंकी पांडेंची मुलगी अनन्या पांडेची चौकशी केली होती. मात्र, आता आर्यन खान आपल्या घरी परतला आहे, पण चंकी पांडेच्या कुटुंबाचा त्रास वाढतच चालला आहे, कारण आता त्यांचा भाऊ चिक्की पांडे यांना मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर लावलेल्या खंडणीच्या आरोपासंदर्भात चिक्की पांडेला समन्स पाठवण्यात आले आहेत.

असे आले चिक्कींचे नाव समोर

गोसावी यांनी सॅम डिसूझा यांना आर्यनच्या अटकेची माहिती दिली होती. त्यांना ताबडतोब शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीशी संपर्क साधायचा होता. यानंतर तो मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या मालकाला भेटला, जो चंकी पांडेंचा भाऊ चिक्की पांडेंना चांगला ओळखत होता. चिक्की पांडेंकडूनच त्यांना पूजा आणि तिच्या पतीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळाले होते. सॅम डिसूझा यांच्या वक्तव्यात चिक्कीचे नाव समोर आले आहे. चिक्की पैशांनी भरलेली बॅग घेऊन लोअर परळला आले होते, असा दावा सॅम यांनी आपल्या वक्तव्यात केला आहे. चंकी पांडेंच्या भावाला एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर पैसे वसूल केल्याच्या आरोपासंदर्भात हे समन्स पाठवण्यात आले आहेत.

चिक्की अनेक रहस्ये करू शकतो उघड

याप्रकरणी मुंबई पोलिसांचे एसआयटी पथक चिक्की पांडेंची चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे. चिक्की यांनी एजन्सीला समन्सचे उत्तर देताना सांगितले की, प्रकृती अस्वस्थ असल्याने तो तेथे उपस्थित राहू शकत नाही. आता चिक्की पांडेंना चौकशीसाठी कधी बोलावले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिक्की यांना डिसूझा आणि गोसावी यांच्यातील संभाषणाबद्दलच चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Claim Free Bets

आर्यन खान जामिनावर आहे बाहेर

क्रूझ शिपमध्ये होत असलेल्या अं’मली पदार्थ पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतरही आर्यन खानचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही. जामिनानंतर काही दिवसांनी एनसीबीच्या एसआयटी पथकाने आर्यन खानला पुन्हा चौकशीसाठी समन्स बजावले होते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध क...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveव्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ध...

    बिटकॉइन व्यवहारांची माहिती सरकार गोळा करत नाही: अर्थ...

    December 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले की, क्रिप्टोकरन्सी चुकीच्या हातात जाऊ नये याकरिता लक्ष ...

    विश्वास नांगरे-पाटलांची समीर वानखेडे लाचखोरी प्रकरणा...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोप...