1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway      2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण भरारी’

Golden-Bharari-thefreemedia
Spread the love

पहिल्यांदा भारताच्या खात्यात पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या पदकाची कमाई

नवी दिल्ली : यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत विविध खेळांमध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. महिला व पुरुष दोन्ही गटातील खेळाडूंनी या सत्रात सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली असून पदकतालिकेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या खात्यात सहाव्या सुवर्णपदकाची भर झाली तेव्हा या पदकासोबत भारताच्या खेळाडू सुधीरने एक नवा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे. सुधीरने हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात २०८ किलो व दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलत स्पर्धेच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

एकूण १३४.५ गुण मिळवत सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग या प्रकारात पहिल्यांदाच भारताच्या खात्यात पदकाची भर घातली आहे. आजपर्यंतचा या क्रीडा प्रकाराचा इतिहास बघता कुठल्याही भारतीय भारोत्तलन खेळाडूने यापूर्वी ही कामगिरी केली नव्हती, त्यामुळे भारतीय क्रीडा जगताकरिता व संपूर्ण भारतीयांकरिता हा अभिमानाचा क्षण होता. सुधीरने केवळ स्वतःच्या नावे विक्रमाची नोंद केली नसून, भारताच्या शिरपेचात देखील मानाचा तुरा खोवला आहे.

एकंदरीतच, भारतीय खेळाडूंच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील या सत्रातील कामगिरीने भारतीय क्रीडा जगताकरिता सकारात्मक व आशादायी चित्र निर्माण केले आहे. येत्या काळात नवोदित खेळाडूंना यामुळे नक्कीच प्रेरणा मिळेल व ऑलिम्पिकसारख्या (Olympics) स्पर्धेत अशाच प्रकारे दर्जेदार प्रदर्शन करण्याकरिता त्यांचा उत्साह व मनोबल वाढण्यास मदत मिळेल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिक्षकांना जुनी पेन्शनकरिता शासनस्तरावर पाठपुरावा कर...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिक्षकांसाठी दिलासादायक बातमी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू व्हावी ही रास्त मागणी अस...

    “मला मुख्यमंत्री असल्यासारखच वाटतयं..”; ...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मला अजूनही मुख्यमंत्र...

    दिल्लीशी नरीमन पॉईंट जोडणार; गडकरींचं स्वप्न

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील नरीमन पॉंईंटपासून ते थेट दिल्लीपर्यंत सागरी सेतू बांधण्याचे माझे स्वप्न आहे. तसेच मुंबईतील सी लिंक...