1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कॉंग्रेसच्या आमदार पुत्रास बलात्कार प्रकरणी अखेर अटक

Spread the love

6 महिन्यापासून होता फरार

मध्य प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी यूथ काँग्रेस संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेतील आरोपी आमदार पुत्राने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित तरुणीने काँग्रेस आमदार पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता. अखेर यानंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

करण मोरवाल असे अटक केलेल्या काँग्रेस आमदार पुत्राचे नाव आहे. तो बडनगरचे काँग्रेस आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा आहे. आरोपी करणवर पोलिसांनी बलात्कारासह अन्य गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण बरंच तापले होते. तसेच राजकीय दबावामुळे पोलीस कायदेशीर कारवाई करत नसल्याचा आरोप पोलिसांवर झाला होता.

पण अखेर सहा महिन्यांनंतर आरोपी करण मोरवाल याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. विवाहबाह्य संबंधातून मॉडेलच्या हत्येचा कट; भररस्त्यात घातल्या गोळ्या आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. बलात्कार केल्यानंतर आरोपी करणने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित मुलगी इंदूरची रहिवासी आहे.

Claim Free Bets

पीडितेने गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी करण बराच काळापासून फरार होता. आरोपी करणला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षिसाची घोषणा देखील केली होती. पोलिसांनी सुरुवातीला 10 हजार, नंतर 15 हजार आणि अलीकडेच 25 हजार रुपयांची घोषणा केली होती. काका खाऊला पैसे देतायेत समजून 7 वर्षांची चिमुरडी गेली पुढे, झाली भयंकर अवस्था आरोपी नेपाळला पळून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधान मोदींचा केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि सीब...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात भ्रष्टाचाराला वाव नसल्याचा मोदींचा दावा जगात कुठलीही जागा देशाची फसवणूक करणाऱ्यांसाठी सुरक्षित असता क...

    नागपुरात पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट

    August 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love८ ते ११ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा ईशारा; जिल्हाधिकारी नागपूर: भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात दिनां...

    जगातील सर्वाधिक सुरक्षित शहराच्या यादीत ‘महारा...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची...