1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशात उदंड झाली करोना लस, आता साठवणीची चिंता

Spread the love

देशात करोना लसीची टंचाई पूर्णपणे संपुष्टात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. देशात गेल्या नऊ महिन्याच्या आत लसीचे इतके डोस शिल्लक आहेत की, राज्यांनी मनात आणले तर दोन दिवसात लसीकारणाचा आकडा १०० कोटींवर जाऊ शकेल असा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पोहोचविण्यात आलेल्या लस डोसांचा आकडा ८ कोटी पेक्षा अधिक आहे मात्र तरीही गेल्या १२ दिवसात लसीकरणाचा आकडा १ कोटींच्यावर गेलेला नाही असे समजते. परिणामी केंद्राला लसीच्या ओव्हर स्टॉकची चिंता लागली आहे. १६ जानेवारी पासून कोविड १९ लसीकरण सुरु झाल्यापासून प्रथमच इतका स्टॉक झाला आहे. केंद्राने पूर्वीच सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पुरेशी लस देशात उपलब्ध असेल असा दावा केला होता असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

आत्तापर्यंत एका दिवसात अडीच कोटी डोस देण्याचा विक्रम केला गेला आहे त्यातुलनेत चौपट स्टॉक आजमितीला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसादिवशी एका दिवसात अडीच कोटी पेक्षा अधिक डोस दिले गेले होते मात्र त्यानंतर लसीकरणाचा वेग ५० टक्के घसरला आहे. सर्व राज्यांना लसीकरण वाढविण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. अर्थात लस मुबलक उपलब्ध होण्यामागे सिरम आणि भारत बायोटेकचे योगदान मोठे आहे. सिरम सध्या महिन्याला २० कोटी डोस पुरवत आहे तर भारत बायोटेकने सुद्धा पुरवठा वाढविला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ !

    April 18th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशात परत एकदा कोरोना संक्रमितांचे प्रकरण वाढत चालले आहेत. मागील २४ तासात देशभरात २,१८३ कोरोनाचे रु...

    इस्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर!

    March 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइस्रायलच्या पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ” पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताला पहिली अध...

    खेळाडूंसह सर्वांनी नियमित योगासने करावी; डॉ. सुभाष च...

    June 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपुरात धावत्या मेट्रोत साजरा झाला जागतिक योगदिवस नागपूर :- शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध व्यायाम आणि आ...