1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

डिमार्टचे सीईओ इग्नेशियस नरोन्हा झाले अब्जाधीश

Spread the love

४७ वर्षीय नरोन्हा, भारताचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापक

भारतभर डिमार्ट रिटेल स्टोअर्स चालवणाऱ्या अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केट्स लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इग्नाटियस नविल नरोन्हा यांच्या संपत्तीत एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कारण डीमार्ट रिटेल फर्मच्या शेअर्समध्ये यावर्षी ११३ टक्क्यांनी आश्चर्यकारक वाढ झाली आहे. बीएसई वर आजच्या ट्रेडिंग मध्ये, या स्टॉकने इंट्रा डे मध्ये ५,८९९ रुपयांच्या नवीन विक्रमाला स्पर्श केला आहे आणि मार्केट कॅपने ३.५४ लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे.

गेल्या सात सत्रांपासून शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि ही वाढ ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यासह, ४७ वर्षीय नरोन्हा, भारताचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापक बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही ७,७४४ कोटी झाली आहे. सध्या, कंपनीमध्ये नरोन्हा यांचे १३.१३ दशलक्ष शेअर्स म्हणजेच २.०३ टक्के इतके भागभांडवल आहे.

अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केटच्या शेअर्समध्ये १९ पट वाढ झाल्याने त्याच्या संपत्तीमध्ये झाली आहे. हा स्टॉक २१ मार्च २०१७ रोजी बाजारात सूचीबद्ध झाला. त्याची इश्यू किंमत २९९ रुपये होती. तेव्हापासून, या स्टॉकमध्ये १८०० टक्के वाढ झाली आहे. मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या नरोन्हा यांनी नर्सी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भाजप नेते म्हणतात; पेट्रोल २०० रुपये लिटर झाल्यानंतर...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसध्या देशात इंधन दरवाढ हा ज्वलंत विषय असून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढत आहेत. मागील २० दिवसांमध्ये तब्बल...

    ..तर, इलेक्ट्रीक गाड्या खरेदी करा; इंधन दरवाढीवर गडक...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढ आता नवनवीन उच्चांक करताना दिसत आहे. त्यातच केंद्...

    पर्यावरणीय प्रश्नाचा सामना करण्यासाठी ‘पंचामृत...

    November 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) ग्लासकोमधील हवामान बदल शिखर COP 26 परिषदेला संबोधित केलं...