1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

यवतमाळच्या धीरज जगतापला धर्मांतर प्रकरणात कानपूरमध्ये ATS कडून अटक

dheeraj-jagtap
Spread the love
धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक

उत्तर प्रदेशमध्ये सध्या धर्मांतराचा विषय चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात आणखीन एक अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव धीरज जगताप असून तो महाराष्ट्राच्या यवतमाळमधील राहणार आहे. धीरज जगतापला दहशतवादी विरोधी पथकाने उत्तर प्रदेशच्या कानपूर मधून अटक केली आहे.

अवैधरित्या धर्मांतरण करण्यासाठी धीरजकडून व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात आले होते. त्यामधून तो धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत होता अन् अवैध्यरित्या धर्मांतर करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. तो पुसद शहरातील वसंत नगर भागात राहणारा डॉक्टर फराज शहा सोबत धर्मांतराचे काम करत होता. डॉ. फराज याला लखनऊ एटीएसने दीड महिन्यापूर्वी पुसद शहरातून अटक केली. त्यानंतर धर्मांतरासाठी काम करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला.

यानंतर पुढे राज्यासह देशभरात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी यवतमाळ शहरातील धीरज जगताप या युवकाला कानपूर मध्ये अटक झाली. धीरज यवतमाळ मध्ये कंत्राटदार म्हणून काम करत होता. मात्र काही दिवसानंतर त्याने धर्मांतर करून तो घराबाहेर पडला तो घरी फिरकत नसल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन निघून गेली. लखनऊ एटीएसने धिरजला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळातील स्थानीक एटीएसच्या पथकाने धीरजच्या वाघापूर परिसरातील घराची पाहणी केली. मात्र त्याचे त्याचे वृद्ध वडील आढळून आले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राजू शेट्टींच्या आमदारकीवर टांगती तलवार

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून, य...

    राहुल गांधीच्या ‘त्या’ मताशी अमेरिका असहमत

    February 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवॉशिंग्टन – चीन आणि पाकिस्तानला भाजपशासित केंद्र सरकारनेच एकत्र आणल्याचा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी के...

    युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअटक होण्याची शक्यता ‘या’ कारणांमुळे अडचणीत मित्रांसोबत लाइव्ह चॅट करताना वापरलेल्या एका शब्दाला...