1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

प्रत्येक शाळांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ हवेत; तज्ज्ञांच्या सूचना

Bhagat-Singh-Koshyari
Spread the love

लहान मुलामंध्ये मानसिक आजार वाढताहेत

प्रत्येक व्यक्ती जीवनात कधी ना कधी मानसिक समस्यांचा सामना करते. परंतु, आज मानसिक आजार वाढत आहेत. लहान मुले व विद्यार्थ्यांना देखील मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी मानसिक समस्यांच्या निराकरणासाठी केवळ वैद्यकीय दृष्टिकोन न ठेवता समग्र दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. या दृष्टीने भारतीय साहित्य, शास्त्र व तत्वज्ञान यांतून निश्चितपणे दिशादर्शन होऊ शकेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. लहान मुले व युवक देशाचे भवितव्य आहेत असे सांगून प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ असावे तसेच मानसिक आरोग्य हा विषय मुलांना शाळेतून शिकवला जावा, असे बॉम्बे सायकिअँट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ अविनाश डिसुझा यांनी सांगितले.

लहान मुलांमध्ये मानसिक ताणतणावात वाढ का तपासलं पाहिजे?

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी राजभवन येथे ‘मानस‍िक आरोग्य समस्या : एक वाढती चिंता’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले, त्यावेळी मानसोपचार तज्ज्ञांना संबोधित करताना ते बोलत होते. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित या चर्चासत्राचे आयोजन बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीतर्फे करण्यात आले होते. एकीकडे जग वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करीत आहे, तर दुसरीकडे कोरोना सारखे नवनवे आजार आव्हान म्हणून पुढे येत आहेत, व विकसित राष्ट्रे देखील त्यामुळे बाधित होत आहेत. नव्या युगात इंटरनेट व मोबाईल फोनचा वापर वाढत आहे. परंतु त्यामधून लहान मुलांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत आहेत का हे तपासले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कुपोषणाविरुद्ध लढण्याकरिता “न्यूट्रिशन स्मार्ट...

    November 11th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी बुधव...

    रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाबरिया यांन...

    April 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई – रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाबरिया यांना येस बँक-डीएचएफएल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणा...

    मंकीपॉक्सच्या संसर्गाबाबत केंद्राचा राज्यांना इशारा;...

    July 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: संपूर्ण जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकार आता सतर्क झालं आहे. गुरुवारी केंद्र ...