1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

परीक्षार्थींकरीता हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच:अतुल भातखळकर यांनी लगावला टोला

Spread the love

राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून चांगलाच गदारोळ झाला आहे. संभ्रम निर्माण झाल्याने ठाकरे सरकारवर चांगलीच टीका होत आहे. भाजपने महाविकासआघाडीवर या मुद्ययावरून खडसवणी केली आहे. ‘टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर पोहचायला आता हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’ असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेच टोपे यांना लगावला आहे.

परीक्षांसंदर्भातील ठाकरे सरकारच्या या निर्णयावर अतुल भातखळकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. ‘२४ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी परीक्षार्थींना सकाळी एका जिल्ह्यात आणि दुपारी वेगळ्याच जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ करण्यात आला आहे. मग परीक्षार्थींनी ही परीक्षा द्यायची कशी? त्यामुळे टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पोहोचण्यासाठी आता तुम्ही हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’, असा संतप्त टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

एकाच दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर ते दोन्ही सेंटर वेगवेगळ्या जिल्ह्यात.टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरचीच व्यवस्था करा. आरोग्य विभागाच्या परीक्षेत दुसऱ्यानंद गोंधळ झाला आहे. थोडी तरी लाज शिल्कक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा आणि असे न झाल्यास मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असा इशारा सुद्धा अतुल भातखळकर यांनी दिला. आरोग्य विभागाच्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने साडे आठ लाखांवर जास्त परीक्षार्थीना वेठीस धरण्याचा महापापाची पुनरावृत्ती करण्यास काम महाभकास आघाडी सरकारने केल आहे’,असे देखील ते म्हणाले.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा तरी सुरक्षित आह...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveखासदार संजय राऊत यांचा पंतप्रधानांना सवाल हिंदुत्ववाद या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख...

    वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी आज नवी नियमावली जाहीर...

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील या...

    वूमन 4 क्लायमेट एक महत्वपूर्ण पाऊल

    October 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveएक महत्वाचे पाऊल हवं बदलालकरीता महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्यांनी उचलेल आहे. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्र...