1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बीडमध्ये तब्बल ४०० जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

thumbnail-thefreemedia
Spread the love

बलात्कारी आरोपींमध्ये पोलिसाचाही समावेश

बलात्काराची एक धक्कादायक घटना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. १६ वर्षांच्या मुलीवर गेल्या सहा महिन्यांत तब्बल ४०० लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. पीडितेने तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्यावर एका पोलिसाने देखील तिचे लैंगिक शोषण केले होते. आता ही पीडिता दोन महिन्यांची गरोदर आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, काही वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. पण, तिला पती आणि सासरच्या मंडळींनी मारहाण आणि वाईट वागणूक दिली आणि छळ केला. त्यामुळे ती पळून गेली आणि वडिलांकडे राहायला आली. पण, तिला वडिलांनी परत न घेतल्यामुळे ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बसस्थानकावर भीक मागायला लागली. यातूनच तिला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले.

ती बालकल्याण समितीला दिलेल्या निवेदनात म्हणाली, अनेकांनी माझ्यावर अत्याचार केले आहेत. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेकवेळा गेले, परंतु पोलिसांनी दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्याऐवजी, माझ्यावर एका पोलिसाने अत्याचार केला. दरम्यान, या आठवड्यात पीडितेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, बालविवाह प्रतिबंध कायदा, पॉस्को आणि भारतीय दंड संहितेच्या बलात्कार आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रविवारी बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामासामी यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आल्याचे एएनआयशी बोलताना सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘इंदुमती कदम’ यांना लायन्स क्लब चा आदर्श...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपरभणी: शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी परभणी येथे लायन्स क्लब परभणीच्या वतीने 2021 चा जिल्ह्यास्तरीय आदर...

    भूषण गगराणी असतील मुख्यमंत्र्याचे सचिव

    July 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: शिंदे फडणवीस सरकारमध्ये अधिका-यांचीही वर्णी लागली असून, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुख्यम...

    महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना ‘फ्लॉरेंन्स ना...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोर...