1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या मेळघाटातील ‘धाराकोट’मध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी

Spread the love

लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना यश आले. त्यामुळे मेळघाटातील या गावात २३४ व्यक्तींचे लसीकरण होऊन कार्यक्रम यशस्वी झाला.

धारणी येथून १७ किमी अंतरावर असणारे धाराकोट हे गाव बिजूधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आहे. या गावातील कुणीही आतापर्यंत लसीकरणाचा लाभ घेतला नव्हता. काही गैरसमजुतींमुळे कुणीही लसीकरण करुन घेण्यास तयार नव्हते. लसीकरणासाठी गेलेल्या पथकाला दोनवेळा तसेच परतावे लागले. यातून मार्ग कसा काढायचा याचा पेच त्यामुळे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यापुढे उभा राहिला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी दिनेश अंभोरे व त्यांच्या पथकाने प्रभावी समुपदेशनाची प्रक्रिया राबवली.

प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. संवादाचा सिलसिला गावकऱ्यांचे मत अनुकूल होईपर्यंत निर्धारपूर्वक सुरू ठेवला. लसीकरणाचे फायदे सांगतानाच त्यापासून भीती बाळगणे कसे निरर्थक आहे, हे पटवून दिले. या सातत्यपूर्ण संवादाने चांगला परिणाम केला व गावकरी लसीकरणाला तयार झाले. बिजूधावडीची एक टीम तयार होतीच. त्यांच्या मदतीला तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुसरे पथक पाठवले. गावात दोन टप्प्यामध्ये २३४ व्यक्तींचे लसीकरण झाले. आरोग्यसेविका स्वाती राठोड, छाया नेमाडे, आरोग्यसेवक राजेंद्र चकुले यांनी योगदान दिले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    क अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

    May 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुबंई: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी...

    कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत यश मिळवणारच; देव...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसध्या आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मुंबई महानगर पालिका हि देशातील...

    सावरकरांच्या होणा-या अपमानावर आम्हाला बोलता आले नाही...

    July 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईतील सिद्धिव...