The Free Media

exams-thefreemedia

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (Maharashtra Common Entrance Test Cell) कडून काही दिवसांपूर्वीच MHT CET 2022 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनच्या कालमर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 11 मे पर्यंत परिक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये 5 सीईटी परीक्षांचा समावेश असणार आहे. यंदा MHT CET Exams 2022 (MHT-CET 2022, MAH MBA/MMS CET 2022, MAH MCA CET 2022, MAH M-ARC CET 2022 and MAH M-HMCT) या परीक्षा देणार्‍यांसाठी ही मुदतवाढ लागू असणार आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स मधील या 5 सीईटी परीक्षांसाठी cetcell.mahacet.org या महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षांच्या अधिकृत वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. दरम्यान विद्यार्थी, पालकांकडून सातत्याने मुदतवाढ द्यावी यासाठी मागणी करत होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सीईटी परीक्षेसाठी कसं कराल ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
MHT CET 2022, MAH MBA/MMS CET 2022, MAH MCA CET 2022, MAH M-ARC CET 2022 and MAH M-HMCT 2022 यापैकी तुम्ही ज्या सीईटीला सामोरं जात आहात त्याची निवड करा.
new registration वर क्लिक करा आणि तुमची माहिती भरा.
तुमचा फॉर्म भरल्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट्सदेखील अपलोड करा.
अ‍ॅप्लिकेशन फी भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमीट करा.
त्यानंतर तुमचा फॉर्म प्रिंट आऊट काढण्यासाठी डाऊनलोड करू शकता.

यंदा JEE , NEET परीक्षेसोबत सीईटीच्या परीक्षा येत असल्याने सीईटीच्या परीक्षांमध्ये तारखांमध्ये बदल झाला आहे. या परीक्षांचेही सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. PCM ग्रुपची परीक्षा 05 ते 11 ऑगस्ट, 2022 आणि PCB ग्रुपची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

Shiv Sena-sanjay-raut-thefreemedia

बंडखोर व गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद – खासदार विनायक राऊत

शिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. शिवसेनेचं नाव

Read More »
Chief Minister Shinde-thefreemedia

सावरकरांच्या होणा-या अपमानावर आम्हाला बोलता आले नाही; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर

Read More »
stratup-thefreemedia

स्टार्टअप आणि युनिकॉर्न हे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे नवीन चालक

नवी दिल्‍ली: केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाने नवीन संधी उपलब्ध करून आणि देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे चालक म्हणून युवावर्गाला प्राधान्य देऊन देशाच्या आर्थिक परीदृश्यात विस्मयकारी परिवर्तन

Read More »

Latest News