1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मोदी सरकार ‘लॉंच’ करणार नवीन वाहिनी

narendra modi1
Spread the love

लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजासह माहितीपूर्ण कार्यक्रमही पाहण्यासाठी मोदी सरकार नवी वाहिनी सुरु करणार आहे. या चॅनेलचे नाव आहे, संसद टीव्ही.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १५ सप्टेंबरला या नवीन वाहिनीची लाँचिंग करण्यात येणार आहे.

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही मिळून संसद टीव्ही वाहिनी बनविण्यात आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्ण सिंह, अर्थतज्ज्ञ बिबेक देब्रोय, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि वकील हेमंत बत्रा हे या नवीन वाहिनीवर स्वतंत्र कार्यक्रमांचे संचालन करतील, असं सूत्रांनी सांगितले.

संसद टीव्ही ही एक माहितीपूर्ण वाहिनी असेल. या वाहिनीद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी लोकशाही मूल्ये आणि देशातील संस्थांशी संबंधित विषयांवर उच्च दर्जाची माहिती सादर करेल, असे सूत्रांनी सांगितले.

Claim Free Bets

संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर संसद टीव्हीवर लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रसारण केले जाणार आहे. संसद टीव्ही ही वाहिनी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत औपरिकरित्या लाँच केली जाईल.

अर्थमंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव सान्याल अर्थव्यवस्थेवर आणि शल्य चिकीत्सक अंबरीश मिथायी हे आरोग्यसंबंधीच्या विषयांवरील कार्यक्रमाचे संचालन करतील. काँग्रेस नेते कर्ण सिंह हे विविध धर्मांबाबत, तर बिबेक देब्रोय हे इतिहास आणि अमिताभ कांत हे भारतातील सुधारणांवरील कार्यक्रमाचे संचालन करतील. हेमंत बत्रा कायद्यांशी संबंधित विषयांवर कार्यक्रमाचे संचालन करतील.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Maharashtra School I राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु...

    June 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात महत्वाची म...

    पुण्यात मनसेच्या पदाधिका-यांचा वाद चव्हाट्यावर

    May 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्दा दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. राज्यभरातून हजारो कार्य...

    एकनाथ शिंदे यांचे गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन

    June 23rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. याचा एक...