1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु

Spread the love

जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आले आहेत. यामध्ये खुल्या मैदानवर किंवा सभागृहातील विवाह सोहळ्यांमध्ये फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असून सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. तसेच अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. हे सर्व निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.

दरम्यान, या बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, करोना कृती दलाचे डॉ़ संजय ओक, डॉ़ शशांक जोशी, डॉ़ अजित देसाई, डॉ़ राहुल पंडित आदी उपस्थित होते.

  Avatar

  RAHUL PATIL

  All Posts

  Latest News

  Related Post

  View All

  संजय राऊत : तर वहिनीसाहेंबाचाही आग्रह आम्ही पाळू; ..

  March 22nd, 2022 | RAHUL PATIL

  Spread the loveनागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. ...

  ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना सोडली’; छगन भु...

  October 18th, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveराज्याचे अन्न ,नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे काल नागपुरात होते. त्यांनी त्या ठिका...

  ‘मुख्यमंत्र्यांनी पत्र द्यावे लगेच मुंबई लोकल ...

  September 21st, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसाम...