1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कोरोनामुळे संपूर्ण जग भयभीत झाले असताना सुद्धा मोदींनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केले’

Spread the love

कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात भारताने मोठी कामगिरी साध्य केली असून आज लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा केवळ २७३ दिवसांत पार करून विश्वविक्रम केला आहे. या निमित्ताने भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने कांदिवली पूर्व येथील कामगार रुग्णालय लसीकरण केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात १०३ कोरोना योद्धे व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

‘भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करत एक नवा इतिहास रचून जगभरात डंका वाजवली आहे, यातून ‘मोदी है तो मुमकिन है’ हे संपूर्ण जगाने पुन्हा एकदा अनुभवले असल्याचे मत आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी १०० फुगे आकाशात सोडत सर्वांनी हा सुवर्णक्षण साजरा केला. यावेळी कामगार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नायर, डॉ. छेडा, नगरसेविका सुनिता यादव, भाजपा पदाधिकारी राणी द्विवेदी, आप्पा बेलवलकर, सुधीर शिंदे, नितिन चौहान, रवी विश्वकर्मा व अनेक ज्येष्ठ पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनामुळे संपूर्ण जग भयभीत झाले असताना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आपली कार्यकुशलता दाखवत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केले, २ लाख कोटी रुपयांची गरीब कल्याण योजना जाहीर करून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देत उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही असा सर्व भारतीयांना विश्वास देणे असो किंवा २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी केलेली मदत असो, अत्यंत कमी काळात देशभर आरोग्य सुविधा उभारणे असो किंवा शास्त्रज्ञ व डॉक्टरांना आर्थिक व प्रशासकीय मदत देत केवळ ४ महिन्यांच्या काळात लस शोधणे असो, मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाला कोरोना महामारीतून सुखरूप बाहेर पाडण्याचे काम केले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भाजप केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार या भ्रमात र...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतीय राजकारणावर पुढील अनेक दशके भाजपचे वर्चस्व राहणार आहे आणि मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेस ने...

    भारताची अभूतपूर्व कामगिरी; प्रथमच थॉमस कपवर उमटवली म...

    May 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइंडोनेशिया: भारताने ऐतिहासिक व अभूतपूर्व कामगिरी करत थॉमस कपच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव ...

    हिजाब प्रकरण चिघळले ; कर्नाटकात सर्व शैक्षणिक संस्था...

    February 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveबंगळूरु, नवी दिल्ली : कर्नाटकात हिजाब प्रकरण मंगळवारी आणखी चिघळल़े राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिज...