1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दिवाळीपूर्वी अनिल देशमुखांसह राष्ट्रवादीचे नेते तुरुंगात दिसणार; किरीट सोमय्याची भविष्यवाणी

Spread the love

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. काल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली आहे.

सध्या देशमुख हे गायब आहेत. ईडी त्यांचा शोध घेत असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी देखील वाढत आहेत. अशातच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देशमुख यांच्या अटकेबाबत महत्वाचा दावा केला असून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत देखील धक्कादायक दावा केला आहे.

‘दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे,’ अशी भविष्यवाणी सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. यासोबतच, अनिल परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट परब यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं देखील सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यसरकार विरोधात एफआरपी मुद्यांवर आंदोलन करणार; सद...

    September 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशेतकऱ्याना कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याने याविरोधात राज्य सरकरांकडूनही काहीच कारवाई होत नस...

    मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला बच्चू कडूंची ‘दांडी...

    June 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई :- महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत ६ जागांसाठी ७ उमेदवार मैदानात असल्याने व उमेदवार निवडून येण्...

    राज्यसरकारच्या चौकशीला आव्हान देणारी परमबीर सिंहांची...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना चौकशीच्या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिला आहे. आपल्या विरोधातील चौकशील...