1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘राष्ट्रवादीने कॉंग्रेसमध्ये विलीन व्हायला हवं’; वड्डेटीवार

vijay vaddetiwar
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेसची स्थितीबद्दल भाष्य केलं होतं. काँग्रेसची अवस्था गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, असं भाष्य पवारांनी केलं होतं. हे विधान काँग्रेसला चांगलंच झोंबल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं अशी ऑफर देत टोला लगावला होता.

आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील बाळासाहेब थोरात यांचं समर्थन केलं आहे. ‘खरंतर सर्व विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर मूळ काँग्रेसच्या विचारधारेतूनच निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे आपण आपसात मतभेद ठेवण्यापेक्षा, टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आणि एकमेकांना दुखावण्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात बोलण्यापेक्षा एकत्रं आलं पाहिजे,’ असं मत वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडलं.

यासोबतच, ‘आपण एकाच विचारधारेचे आहोत. अशावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन शक्ती वाढवावी ही भूमिका योग्यच आहे,’ असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते ?

पवार यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचे नुकसान होणार नाही. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी बांधिल असलेल्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढा द्यावा, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना केलं.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “आता आम्ही मागे हटणार नाही”, नवाब मलिक यांच्या कन्ये...

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआर्यन खान प्रकरणापासून राज्यात सुरू असलेला वाद अजून शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. सुरुवातीला फक्त एक ड्रग्ज प्...

    एसटी कर्मचा-यांचे आंदोलन आणखी चिघळणार…!!

    November 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील 1 हजार 135 एसटी कर्मचारी निलंबित आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचार्‍या...

    पाडवा विशेष…’मटणा’चे भाव गगनाला...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveश्रावण मास संपण्याची वाट बघणारे नागपूरकर व राज्यातील सर्वच नागरिकांच्या खिशास चाप बसणार असल्याची माहिती आज ...