1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

१२ आमदारांचे निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालय

supremecourt-thefreemedia
Spread the love

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील 12 आमदारांचे निलंबन रद्द करून ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे. यावर ‘त्या’ 12 आमदरांपैकी एक असलेले अतुल भातखळकर यांनी हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे अशी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, ” सर्वोच्च न्यायालयाने आज 12 निलंबित आमदारांविषयी दिलेला निर्णय हा लोकशाहीचा विजय असून पुन्हा एकदा महाभकास आघाडी सरकारचे त्यांच्या हुकूमशाही कारभाराला आणि प्रवृत्तीच थोबाड फोडणारा हा निर्णय आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले,” आम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदार संघातल्या लोकांना न्याय देणारा हा निर्णय आहे. केवळ आणि केवळ आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून अन्यायाने, गैर पद्धतीने, बेकायदेशीर पद्धतीने आम्हाला निलंबित करण्यात आले होते. ते सुद्धा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता. त्यामुळे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मोडून काढला. या निर्णयावर आपले निकालपत्र दिले. याच्या बद्दल लोकशाहीचे आभार मानतोच. तसेच हा निर्णय लोकशाहीचा विजय आहे. हा आमच्या मतदार संघातल्या लोकांचा विजय आहे,” असे म्हणत अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    2035 पर्यंत नेट झिरो कार्बन कंपनी बनण्याचं उद्दिष्ट;...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतातील हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ हा सध्या जगापुढचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असून, त्याचे दुष्परिणा...

    देशाने 70 कोटीचा, तर महाराष्ट्राने ओलांडला लसीकरणाचा...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात तीसरी लाट येण्याचे सूतोवाच होत असतांना मागील महिन्यापासून देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या ...

    परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveखंडणी प्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकारी अटकेत मुंबई पोलीस दलातील अधिकारी नंदकुमार गोपाळे व आशा कोकरे यांना अटक...