1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कुसुमलता वाकडे यांना ” साहित्य सेवा सन्मान ” पुरस्कार

event
Spread the love

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउदेशीय संस्था नागपूरतफे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ऊरवेला काॅलनी येथे नुकताच ‘जागतिक मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्यात आला. उत्साहात संपन्न झालेल्या प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात उपक्रमशील आदर्श शिक्षिका कुसुमलता दिलीप वाकडे यांना मराठी साहित्य लेखनाचा “साहित्य सेवा सन्मान पुरस्कार ” देऊन संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सन्मानीत केले.

कुसुमलता वाकडे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी, जिल्हा भंडारा येथे पदविधर शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांचा साहित्य, लेखन, कविता व शैक्षणिक कार्यात उत्स्फूर्त सहभाग असतो. तसेच विद्यार्थीनीकरीता शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवितात. त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ स्तंभलेखक डॉ अनिल पावशेकर यांच्या हस्ते “साहित्य सेवा सन्मान पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

     या भव्यदिव्य साहित्य  संमेलनाचे अध्यक्ष दादाकांत धनविजय, प्रमुख मार्गदर्शक डाॅ. अनिल पावशेकर, प्रा. आनंद मांजरखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मयुर निमजे, डाॅ. सोहन चवरे, रेणुका किन्हेकर, विश्वस्त  उरकुडे यांच्या उपस्थितीत 18 काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा तसेच अनेक राज्यातील 30 कवी-कवियत्रींना "साहित्य सेवा सन्मान पुरस्कार 2021 " साहित्य प्रेमींना देऊन सन्मानित करण्यात आले. 
 दुपारच्या  सत्रात आमंत्रित कवियत्रींचे कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.  या द्वितीय  सत्राच्या अध्यक्ष म्हणून पुण्याच्या स्वाती मराडे यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी नागोराव कोम्पलवार होते.  15 निमंत्रित कवियत्रींनी आपल्या दर्जेदार रचना सादर करून सभागृहात टाळ्याची दाद घेऊन गेल्यात.  

मान्यवरांनी आपापल्या
मार्गदर्शनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीची तळमळ व्यक्त केली.या देखणीय सोहळ्यचे संचालन, सतत राबणारे, होतकरू ,अभ्यासू मराठीचे शिलेदार बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले तर आभार चित्रपट निर्माती कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांनी मानलेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला RSS ने शिकवल...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसांगलीत एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ...

    गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार; मुख्यमंत्...

    July 12th, 2022 | THE FREE MEDIA

    Spread the loveगडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मि...

    अयोध्या प्रकरणी राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास...

    May 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत...