1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वीज कंपन्यांतील नियमित व सहायक कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर

Spread the love

राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. “वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना १२ हजार तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल,” अशी घोषणा डॉ. राऊत यांनी या बैठकीच्या समारोपप्रसंगी केली.

१० हजार सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सुरुवातीला वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांना वगळून १० हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केली. या बैठकीला सर्व संघटनांचे पदाधिकारी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे हे उपस्थित होते. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला ऑनलाइन उपस्थिती लावली

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत’; गु...

    June 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveखासदार संजय राऊतांना गुलाबरावांचे प्रत्युत्तर गुवाहाटी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव प...

    Maharashtra School I राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु...

    June 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात महत्वाची म...

    दहा कॉलेजने अडकविले प्राध्यापकांचे वेतन; विद्यापीठान...

    August 31st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: कोरोना काळात प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवणाऱ्या दहा कॉलेजवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज...