1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशावर शिंदेचे नाव; एकनाथ शिंदे मात्र चिडीचूप

Sanjay Raut-thefreemedia
Spread the love

पुणे: आज मुख्यमंत्री पुणे दौ-यावर आहेत. संजय राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली. तपास करताना तपास अधिकाऱ्यांना संजय राऊत यांच्या घऱी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्यापैकी दहा लाखांच्या नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आढळून आल्याची माहिती समोर आली होती.

एकनाथ शिंदे यांच्याकडे पुण्यात प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांवर तुमचं नाव कसं आलं यासंबंधी चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी संजय राऊतांची चौकशी सुरु आहे. त्यातून लवकरच सत्य समोर येईल, असे सांगत त्यांनी त्यावर जास्त भाष्य करणं टाळत चिडीचूप असण्याची सावध भूमिका घेतली.

ईडीच्या पथकाने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर छापेमारी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलही (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. याशिवाय त्यांच्या दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली. तब्बल नऊ तास चाललेल्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांना राऊतांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. त्यावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख करण्यात आला होता.

  Avatar

  RAHUL PATIL

  All Posts

  Latest News

  Related Post

  View All

  मराठा सेवा संघाकडून अजून प्रस्तावच आलेला नाही; चंद्र...

  September 16th, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveमराठा सेवासंघ ३२व्या वर्षात पदार्पण करत असताना आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम ...

  देशभरात उद्यापासून कॉंग्रेसचे ‘जेलभरो’; ...

  October 6th, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveउत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना त्यांना...

  आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?

  October 1st, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveसिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले होते. त्याविरो...