1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात शिवसेनेचा काँग्रेस विरोधात प्रचार, तर भाजपची धुरा पेलणार बावनकुळे

Chandrashekhar Bawankule
Spread the love

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 16, तर पंचायत समितीच्या 31 जागांवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस, भाजप आणि शिवसेना गावागावात जोमाने प्रचार करत आहेत. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे आमदार आशिष जैस्वाल, तर भाजपकडून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रचाराची एकहाती धुरा सांभाळत आहेत. पाच ॲाक्टोबरला मतदान होणार असून शिवसेनेचा काँग्रेस विरोधात प्रचार सुरु आहे.

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक ही ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यानंतर होत आहे. त्यामुळे हाच मुद्दा घेऊन भाजप महाविकास आघाडी सरकारविरोधात प्रचार करत आहे. गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने नागपूर जिल्ह्यात विकासाचं एकही काम केलं नाही, असा आरोप करत भाजप केलेल्या विकास कामांवर मत मागत असल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

नागपूर जिल्ह्यात कुठल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोटनिवडणूक होणार?

तालुका – जिल्हा परिषद सर्कल

नरखेड – सावरगाव, भिष्णूर
काटोल – येनवा, पारडसिंगा
सावनेर – वाकोडी, केळवद
पारशिवनी – करंभाड
रामटेक – बोथिया
मौदा – अरोली
कामठी – गुमथळा, वडोदा
नागपूर – गोधनी रेल्वे
हिंगणा – निलडोह,
डिगडोह – इसासनी
कुही – राजोला

नागपुरात तिरंगी लढत

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या 12 सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘नागपूर – मुंबई बुलेट ट्रेनसाठी माझ्या प...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानव...

    हिंगणघाटच्या मोहता मिल मजूरांवर उपासमारीची वेळ

    February 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआज साखळी उपोषणाचा पाचवा दिवस वर्धा/हिंगणघाट: आर. एस.एस. मोहता मिल हिंगणघाट येथील मिलमध्ये अनेक वर्षापासून ब...

    डागडुजीच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यातील शाळेचे ऐतिहा...

    February 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: भंडारा जिल्ह्यातील सव्वाशे वर्ष जुनी मन्रो शाळेचे कवेलू बदलण्याचे कार्य चालू आहे. शाळेची डागडुजी हो...