1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात प्राथमिक शिक्षक संघातर्फे हसन मुश्रीफ यांना निवेदन

Spread the love

बुधवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने दिवाळीत बदल्या करणेबाबत व पेसा, दुर्गम भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी सुरु ठेवावी याबाबत मा.ना. हसन मुश्रीफ साहेब, ग्रामविकास मंत्री, खाजगी सचिव मा. रविंद्र पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणेत आली.

शिष्टमंडळाच्या वतीने दिवाळी सुट्टी मध्ये कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या झाल्याच पाहिजेत असा आग्रह धरणेत आला. सर्व कर्मचार्‍यांच्या प्रत्येक वर्षी बदल्या होतात, पण शिक्षकांच्या मात्र गेल्या दोन वर्षात बदल्या झालेल्या नाहीत तसेच आपल्या ग्रामविकास विभागाने शाळा सुरु झाल्यानंतर बदल्या करु असे परिपत्रक काढले होते. ही बाब मंत्रीमहोद व सचिव यांच्या निदर्शनास आणून दिली .

बदल्या न झाल्यामुळे शिक्षकांच्या मध्ये संतापाची लाट आहे . तेंव्हा कोणत्याही परिस्थितीत बदली प्रक्रिया सुरु करणेत यावी . तसेच बदलीसाठी ३० जून व विस्थापित ,गैरसोयीत असणाऱ्या सर्वांसाठी सेवेची अट ३ वर्षे करणे बाबतचे शुद्धीपत्रक बदली आदेशापूर्वी काढण्यात यावे अशी विनंती केली.

Claim Free Bets

तसेच दुर्गम व पेसा क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाल्या नंतर ही एकस्तर वेतन श्रेणी सुरु ठेवावी असा आदेश काढण्यात यावा. अशी विनंती केली. यावेळी मंत्री महोदय म्हणाले की, सॉफ्टवेअर तयार करायला सुरु झाले आहे . परंतु किमान दोन ते तीन महिने लागतील . ऑफ लाईन बदल्या कशा करता येतील याबाबत सर्व अधिकऱ्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेवू व एकस्तर बाबत ही निर्णय घेवू

तसेच मा.राजेंद्र पवार, उपसचिव, शालेय शिक्षण यांचीही भेट घेवून समग्र शिक्षा अभियानचे २००१ पासून आतापर्यंतचे अनुदान हिशोब मागू नये बाबत चर्चा केली व निवेदनही दिले. शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, राज्यसरचिटणीस केशवराव जाधव, शिवाजी चवले, पांडुरंग शिळीमकर, राहूल लोंढे, विजय भरम, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते .

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    १२ वीचा निकाल उद्याच..!!

    June 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे/नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण...

    अखेर भाजप-मनसेची हातमिळवणी; जागांसंदर्भात झाला महत्व...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युती होणार...

    मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर सरकारने आता तरी जागे व...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजालना शहरातील परतूर तालुक्यांतर्गत असलेल्या येनोरा येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही,...