1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सार्वजनिक गणेशमंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा; नितीन राऊत

nitin raut2
Spread the love

नागपूर : गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. गणेशोत्सव पर्व शांततेत पार पडावा, यासाठी नागपुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस जिमखाना येथे पार पडली. नागपूर शहरातील सर्व पोलीस झोनमध्ये आभासी पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळांना अखंडीतपणे वीज पुरवठा मिळणार आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दूर करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी तत्पर राहतील. सार्वजनिक गणेश मंडळे या काळात तात्पुरता वीज पुरवठा घेतात. गणेशोत्सव काळात वापरलेल्या विजेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारला जाणार असल्याची घोषणा डॉ. राऊत यांनी केली.

कोरोनाचे संकट टळलेले नसल्याचे स्पष्ट करून डॉ. राऊत म्हणाले, डेल्टा प्लस वेरीएंटचा शिरकाव शहरात झालेला आहे. पुढील 15 दिवस धोक्याचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही स्थिती विचारात घेऊन गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या पाहिजेत व राज्य सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Claim Free Bets

मंडळ नोंदणीची प्रक्रिया सुलभ करावी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी सूचना करून डॉ. राऊत म्हणाले, अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या गणेशोत्सव मंडळांनी केवळ नूतनीकरणाचा अर्ज भरून नोंदणी करावी. गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक मदतीचे उपक्रम राबवावे. कोरोना काळात अनेक मुले अनाथ झाली आहेत. या अनाथांना मदत करण्याचे आवाहन डॉ.नितीन राऊत यांनी केले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधान नरेंद्र मोदी – मुख्यमंत्री उद्धव ठाक...

    June 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंगळवार 14 जून रोजी एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील...

    अरुण हलदरांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार; नवाब मलिक

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आ...

    परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveखंडणी प्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकारी अटकेत मुंबई पोलीस दलातील अधिकारी नंदकुमार गोपाळे व आशा कोकरे यांना अटक...