1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

modi-thefreemedia '
Spread the love

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याबरोबर चर्चा केली. उभय नेत्यांनी भारत-नेदरलँड्स द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. पाण्यासंबंधित धोरणात्मक भागीदारी, कृषी क्षेत्रातील सहकार्य, उच्च तंत्रज्ञान आणि नव्याने विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य यांचा यात समावेश होता. भारत-युरोपीय संघ संबंध, हिंद-प्रशांत क्षेत्रातील अभिसरण आणि सहकार्यासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही त्यांनी विचारविनिमय केला.

नियमित उच्चस्तरीय भेटी आणि संवादांमुळे, भारत-नेदरलँड संबंधांना नजीकच्या काही वर्षांत प्रचंड गती मिळाली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी 09 एप्रिल 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परिषद आयोजित केली होती. दरम्यान नियमितपणे संवादही सुरूच होता. या परिषदेदरम्यान नेदरलँडसोबत ‘पाण्या संबंधित धोरणात्मक भागीदारी’ चा प्रारंभ करण्यात आला.

भारत आणि नेदरलँड्स यंदा संयुक्तपणे राजनैतिक संबंधांची 75 वर्षे पूर्ण करत आहेत. हा मैलाचा टप्पा असून त्यानिमित्त 4 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत भारताच्या राष्ट्रपतींनी नेदरलँडला भेट दिली आणि उभय देशांनी तो साजरा केला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अफगाणिस्तान मुद्द्यावरून चिदंबरम यानी टोचले UNSC चे कान

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) अफगाणिस्तानवर ठराव मंजूर केल्याबद्दल अभिनंदन करणे ही गडबड ठरेल असे ...

    जपान येथे ‘पोनिटेल’मध्ये मुलींना बघून मु...

    March 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: जपान येथील शाळांनी महिला विद्यार्थिनींना पोनीटेलमध्ये केस घालण्यास बंदी घातली आहे. या मागचे कारण दे...

    काबुल ‘एयरपोर्ट’वर दहशतवादी हल्ल्याची शक...

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमेरिकेने अफगाणिस्तान, काबुल विमानतळाबाहेर उपस्थित असलेल्या आपल्या नागरिकांना तेथून त्वरित सुरक्षित ठिकाणी ...