1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रूग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार; नितीन गडकरींची घोषणा

nitingadkari-thefreemedia
Spread the love

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी गाड्यांना भारतीय वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसविणार असल्याचे सांगितलं होते. याबाबत लवकरच कायदा करणार असल्याची माहिती गडकरी यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. वाहनांना भारतीय वाद्यांचे हॉर्न बसवण्याची भन्नाट आयडिया मांडल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रुग्णवाहिकेच्या सायरनचाही आवाज बदलणार असल्याचे सांगितले.

पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, “मी सर्व मंत्र्यांचे हॉर्न बदलले, लाल दिवे काढून टाकले. आता पोलिस आणि अ‍ॅम्ब्युलन्सचे दिवे आहेत. मी नागपुरात 18व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहतो. रोज एक तास प्राणायम करतो, तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात की साऊंडमुळे किती त्रास होतो. मेडिकल सायन्सप्रमाणे याचा एक दुष्परिणाम होतो आपल्यावर..”

ते म्हणाले, “दवाखान्याची बिलं आपण भरतो, त्याचे कारण वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आहे. मी आता एक ऑर्डर काढणार आहे, की जर्मन संगीतकार होता. त्याने आकाशवाणीची एक ट्यून तयार केली होती. सकाळी साडेपाच वाजता ती ट्यून वाजायची. मी ती ट्यून शोधून काढली आहे आणि मी म्हटलं अ‍ॅम्ब्युलन्सवर ही ट्यून लावा. ती कानाला चांगली वाटते.” लवकरच ही ट्यून रूग्णवाहिकेच्या सायरनमध्ये ऐकू येणार असल्याचे गडकरी म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘या’ कारणामुळे आदित्य ठाकरेंना नोटीस पाठ...

    July 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: मागील पंधरा दिवसापासून राज्यातील राजकारणात नवं नवे ट्विस्ट, धक्कातंत्र पाहायला मिळत असतांना राज्याच्...

    ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला RSS ने शिकवल...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसांगलीत एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ...

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना राज्यातील महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची म...