1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशाने 70 कोटीचा, तर महाराष्ट्राने ओलांडला लसीकरणाचा 6.50 कोटीचा टप्पा

Spread the love

देशात तीसरी लाट येण्याचे सूतोवाच होत असतांना मागील महिन्यापासून देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे. या काळात कोरोना लसीचे अनेक कोटी लस देण्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे. आता त्यात आणखी एका सकारात्मक बातमीची भर पडली आहे. देशातील लसीकरण मोहिमेंतर्गत 70 कोटी डोसचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे 70 कोटी 67 लाख 36 हजार 715 डोस देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात सहा कोटी 40 लाख 78 हजार 584 एवढे डोस देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देशाने साध्य केलेल्या या लसीकरणाच्या टप्प्याचे कौतुक करताना म्हटले की, भारताने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोना लसीकरणाचा 70 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हे यश साध्य करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या 70.67 कोटी लसींपैकी 54.09 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 16.57 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मागील 13 दिवसात एकूण 10 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.

भारतामध्ये मागील 11 दिवसात एकाच दिवसात एक कोटीहून अधिक डोस देण्याचा विक्रम तीनवेळा साध्य झाला आहे. मंगळवारी एकाच दिवसात 1.13 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. येत्या काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘साखर साखर करत राहिलात तर, ‘गडकरीचे मोठे...

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज सातारा जिल्ह्यातील कराडमधील कृष्ण दैद्यकीय महाविद्यालयातील...

    मागील 4 वर्षापासून अमली पदार्थाचे सेवन करतोय आर्यन खान

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर), मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सापडलेल्या अंम...

    मशिदींवरील भोंग्यासाठी दिलेल्या ‘अल्टिमेटम’वर राज ठा...

    May 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेप...