1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राष्ट्रवादीने माजी गृहमंत्र्याबाबत भूमिका स्पष्ट करावी; भाजपची मागणी

anil-deshmukh
Spread the love

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून भूमिगत आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते.

उपाध्ये यांनी सांगितले की, अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की , आपण सीबीआय , ईडी कडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे साह्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे. आता देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख हे का गायब आहेत, ते जनतेसमोर तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस ने तातडीने करावा, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

उपाध्ये यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक व राजकीय कार्यक्रम थांबविले पाहिजेत अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. मात्र गणेशोत्सवासारखा सण तोंडावर आल्यावरच मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्ये का करावीशी वाटतात याचे आश्चर्य वाटते. मंदिरे , चित्रपटगृहे वगळता राज्यात सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. फक्त मंदिरांत जाण्याने कोरोना पसरतो का याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे , असे उपाध्ये यांनी सांगितले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोरोना नियंत्रणात….हॉटेल्स, दुकाने रात्री 12 प...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला कोरोनाचा प्रसार रोखण्यात महत्त्वपूर्ण यश आले आहे. त्यामुळे प्रशासनाने स...

    ‘बीग बी’ने रद्द केला ‘कमला पसंद...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतात तसेच जगभरात कोट्यवधी चाहते असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. सध्या बिग कौन बनेगा कर...

    द्रौपदी मुर्मू भारताच्या वाईट तत्वज्ञानाचे प्रतिनिधि...

    July 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: काँग्रेस नेता आणि प्रवक्ता अजय कुमार यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. त्यांनी म्हटले कि एनडी...